संकल्पना व मार्गदर्शन :-
कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर

 ह्युमस : (जीवन द्रव्य) 

   ह्युमस : (जीवन द्रव्य)
ह्युमस हे अखंड 24 तास चालनार व सतत काहितरी निर्माण करणार व त्याच वेळेला काहितरि घटवनार व जमिनीला सुपिकता प्रदान करणार एक अद्भुत एक असं जैव रासायनिक संयंत्र आहे(बायोकेमिकल). या मध्ये सतत असे काही पदार्थ निर्माण होत असतात जे झाडांच्या वाढीसाठी आवश्यक असतात. त्यामध्ये सर्वच प्रकारचे अन्नद्रव्य,सेंद्रिय आम्ल(ह्युमीक अ‍ॅसीड), संजिवक(हारमोन्स) आणी पिकांना प्रतीकार शक्ती देणारे प्रतीपिंड यांचा समावेश असतो. कोणत्याहि पिकांना लागणारे अन्नद्रव्य म्हणजे जीवन द्रव्य हे पिकांच अन्न भंडार आहे
ह्युमस मध्ये 60% सेंद्रीय कार्बन व 6% सेंद्रीय नत्र असतो. म्हणजे ह्युमस मध्ये कार्बन आणि नत्र यांचा प्रमाण 60:6 म्हणजे 10:1 असतो. ह्याला कर्बनत्र गुणोत्तर

  ( सीएन रेशो) म्हणतात. ह्याचा अर्थ 1 किलो नत्र 10 किलो
कार्बनशी संयोग होतो व ह्युमसचि निर्मीती होते.

मुख्य पानावर परत जाण्या साठी लिंक