संकल्पना व मार्गदर्शन :-
कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर

 बियाणे

शक्य असेल तर कोणत्याहि स्थीतीत गावरानी बीयाणे वापरावे. ते शक्य नसेल तर सुधारित बियाणे वापरावे. पण चुकूनही संकरित बियाणे किंवा बीटी बियाणे वापरू नका. जर आणिबानित गावरानी किंवा सुधारित बियाने उपलब्ध झाले नाही॰ व संकरीत बियान्याशीवाय कोणताही उपाय नाही अशा वेळेस बाजारामध्ये जे संकरीत बियाणे जास्त चालते ते संकरीत किंवा बीटी बियाणे पेरून त्या पेरलेल्या पिकातून सर्वोत्कृष्ट , रोगमुक्त, कीडमुक्त,जास्त उत्पादन देणारे झाडे निवडून त्याचे बियाणे निवडून , त्या निवडलेल्या झाडाचे बियाणे दरवर्षी पेरून अशी निवड ६ वर्षे करून आपल्याला संकरीत बियाण्याचे किंवा बीटी बियाण्याचे सुधारित किंवा देशी बियाण्यामध्ये रुपांतर करता येते .आपले बियाणे आपल्याला तयार करता येते .
झिरो बजेट कृषी आंदोलनामध्ये काही गावे बीज ग्राम म्हणून विकसित करता येतील . व ते बियाणे अन्य नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना उपलब्ध करता येईल.
 

मुख्य पानावर परत जाण्या साठी लिंक